पक्ष्याची सुटका करताना विजेचा झटका लागून जखमी झालेल्या जवानाचा मृत्यू
मुंबई, दि. 01 - येथील महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात वीजेच्या तारांमधून पक्ष्याची सुटका करताना वीजेचा झटका लागून जखमी झालेले अग्निशमन दलाचे जवान राजेंद्र भोजने यांचा आज मृत्यू झाला. विजेचा झटका लागल्यानंतर त्यांना ऐरोलीतील नॅशनल बर्न सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.
राजेंद्र भोजने यांचे पार्थिव ताब्यात घेण्यास त्यांच्या कुटुंबियांकडून नकार देण्यात आला आहे. राजेंद्र भोजने यांना शहीद जवानाचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत त्यांचे पार्थिव ताब्यात घेणार नाही, असे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.
महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात वीजेच्या तारांमध्ये ससाणा पक्षी अडकला होता. त्याचा जीव वाचवताना अग्निशमन दलाच्या तीन जवानांना वीजेचा झटका लागला होता. या घटनेत तिघेही गंभीर झाले होते. त्यातील भोजने यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संजय महादेव काळभेरे आणि दिनेश उत्तमराव सबनकर या दोन जवानांवर अद्याप उपचार सुरु आहेत.