मुख्यमंत्री पर्रिकर यांची स्कूटरस्वारी' थांबणार.
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री असूनही मनोहर पर्रिकर स्थानिक बाजारात खरेदीला जाण्यासाठी स्वत: स्कूटर चालविताना नेहमीच दिसायचे; पण हल्ली अपघाताच्या भीतीने त्यांनी स्कूटरस्वारी कमी केली आहे. यासंदर्भात बोलताना पर्रिकर यांनी सांगितले की, अनेकदा लोक मला विचारतात की, हल्ली आपण स्कूटर चालवताना दिसत नाहीत. पण माझ्या डोक्यामध्ये पूर्णपणे कामाचा व्याप असतो. अशा स्थितीत स्कूटर चालविल्यास अपघात होण्याची शक्यता अधिक असते, असे ते म्हणाले.