Breaking News

आयएनएसव्ही तारिणी’ ही शिडाची बोट सोमवारी गोव्यात परतली

पणजी : जगभ्रमंती करुन सहा महिला नौदल अधिकारी गोव्यात दाखल झाल्या आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सहा महिला नौदल अधिकार्‍यांसह जगभ्रमंतीला निघालेली ‘आयएनएसव्ही तारिणी’ ही शिडाची बोट सोमवारी गोव्यात परतली असून, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी सहा समुद्रकन्यांचं स्वागत केलं. महिला अधिकार्‍यांच्या या चमूमध्ये लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी, लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट कमांडर पद्रपल्ली स्वाती, लेफ्टनंट ऐश्‍वर्या बोध्दापती, लेफ्टनंट शोरगप्पन विजया, लेफ्टनंट पायल गुप्ता यांचा समावेश होता.