Breaking News

दादरमध्ये मोर्चादरम्यान तणाव ?

आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ मोर्चा  

मुंबई, दि. 28 - भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दादर येथील जुनी ऐतिहासिक प्रिटिंग प्रेस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ मंगळवारी रिपब्लिकन सेनेने दादरमध्ये मोर्चा काढला होता. या मोर्चादरम्यान हजारो आंबेडकर अनुयांयी उत्सफुर्तपणे सहभागी झाले हेाते.  या मोर्चामुळे दादर पूर्व भागातील काही दुकान बंद करण्यात आली होती, दरम्यान या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. या मोर्चाचे नेतृत्व आनंदराज आंबेडकर करत असून, आंबेडकर भवन ते भोईवाडा पोलिस स्थानकापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या दि पीपल्स इम्प्रूव्हमेंट या ट्रस्टकडे या दोन वास्तूंची मालकीचा हा वाद आहे.  ट्रस्टने पुनर्विकासासाठी या वास्तू जमीनदोस्त केल्याचे सांगण्यात ऐत असले तरी, या वस्तू ऐतिहासिक असून, या अशा पध्दतीने पाडण्याचे दुर्दैवी असल्याचे मत अनेक आंबेडकरी अनुयांयानी व्यक्त केले आहे. आंबेडकर कुटुंबीयांकडून आलेल्या तक्रारीनुसार याबाबत भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.