अभियांत्रिकीलाही 50 टक्के शिक्षण शुल्क सवलत मराठा समाजासोबतच इतर आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना दिलासा
मुंबई : राज्यातील मराठा समाजासोबतच इतर आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. यापुढे खासगी, अनुदानित, विनाअनुदा नित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेशाच्या वेळी 50 टक्के शिक्षण शुल्क सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाने मागील 3 आठवड्यापूर्वीच हा निर्णय घेतला आहे. याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या वेळीही आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना 50 टक्के शिक्षण शुल्क सवलत देण्यासाठीचे परिपत्रक काढले जाणार आहे. राज्यात मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रातील सवलती देण्यासाठी सरकारने राजर्षी छत्रपती शाहू महाराज राज्य शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना आणली होती. तिचे आता नामकरण हे राजर्षी छत्रपती शाहू महाराज राज्य शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना असे करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमामातून वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना 50 टक्के इतकी रक्कम ही शिष्यवृत्ती स्वरूपात त्यांच्या खात्यावर जमा केली जाते. त्यानंतर ही रक्कम विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयांना अदा करणे आवश्यक आहे.
मात्र अनेक वैद्यकीय महाविद्यालये हे प्रवेशाच्या वेळी आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्क भरण्याची मागणी करतात. ते योग्य नसल्याचे सांगत वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाने एक जीआर काढून यापुढे प्रवेशाच्या वेळी आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षण शुल्काची 50 टक्के रक्कम अदा करणे बंधनक ारक नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रवेशाच्या वेळी कोणत्याही महाविद्यालयांनी संपूर्ण शुल्क भरण्याचा आग्रह करू नये, अन्यथा संबंधित महाविद्यालयांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही वैद्यकीय शिक्षण विभागाने काढलेल्या जीआरमध्ये देण्यात आला आहे. यामुळे या दरम्यान, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय आणि संचालक, आयुष संचालनालय आणि त्यांच्या अख्त्यारित असलेल्या महाविद्यालयांना या जीआरची तातडीने दखल घ्यावी लागणार आहे. तर लवकरच वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत अभियांत्रिकी आणि तंत्र शिक्षणच्या विद्यार्थ्यांना अशाच प्रकारे प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्कात 50 टक्के सवलत देण्यासाठीचा निर्णय जाहीर केला जाणार असल्याची माहिती उच्चस्तरीय अधिकार्यांकडून देण्यात आली आहे.