Breaking News

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढीविरोधात खामगावात काँग्रेसची निदर्शने

खामगाव, दि. 10 एप्रिल -  गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी आता उच्चांक गाठला आहे. आता नोंदवण्यात आलेल्या दरांनुसार डिझेलचा दर प्रतिलीटर 78 रुपयांवर पोहोचला आहे. तर पेट्रोलने 82 रूपयांचा टप्पा ओलांडला आहे. या वाढलेल्या दरांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली असून याचा निषेध करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. खामगाव चे माजी आमदार दिलीपकुमार सांनदा यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या मोर्चात मोटारसायकल लोटगाडीवर ठेवून उपविभागीय कार्यालय येथे धडक देण्यात आली. पेट्रोल, डीज़ल व गैस सिलेंडर दरवाढीच्या निषेधार्थ खामगांव मतदार संघातील काँग्रेस जनांच्या वतीने भाजपा सरकारच्या विरोधात निदर्शनेकरून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी खामगांव काँग्रेसचे पदाधिकारी, युवक काँग्रेस पदाधिकारी,महिला काँग्रेस पदाधिकारी, अल्पसंख्यक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.