मोहन भागवत यांच्या हस्ते देवगडला महाआरती, गंगापूजन


औरंगाबाद, दि. 12, नोव्हेंबर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे दत्त दर्शन घेऊन महाआरती व गंगापूजन केले. देवगड येथील भगवान दत्तात्रयाच्या दर्शनाने नव्या ऊर्जेची प्राप्ती झाल्याचे गौरवोद्गार भागवत यांनी काढले. मोहन भागवतांंचे औक्षण करून देवगड संस्थानच्या वतीने स्वागत करण्यात आले. 

भास्करगिरी महाराज यांनी त्यांचे भगवान दत्तात्रयाची मूर्ती देऊन स्वागत केले. महाआरतीनंतर त्यांच्या हस्ते प्रवरामाईचे जलपूजन करण्यात आले. अ‍ॅड.सुनील चावरे यांनी देवगड येथे राबविण्यात येणा-या उपक्रमाची व भाविकांना देण्यात येणा-या सुविधांची माहिती दिली. 

भास्करगिरी महाराज यांच्या समवेत आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार शिवाजीराव कर्डिले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्र प्रचारक विजय पुराणिक, प्रांतप्रचारक अतुल लिमये आदी उपस्थित होते. डॉ. मोहन भागवत यांनी देवगडच्या स्वच्छ सुंदर परिसराचे, शिस्तीचे कौतुक केले. देवगडच्या क्षेत्राचा संस्थानांनी आदर्श घ्यावा असे आवाहन केले.