शिवसेनेच्या वतीने साखर कारखान्यासमोर जागरण-गोंधळ घालून तीव्र निदर्शने

बीड, दि. 11, नोव्हेंबर - उसाला 3 हजार रुपये भाव देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी आज शिवसेनेच्या वतीने सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना येथे जागरण-गोंधळ घालून तीव्र निदर्शने करण्यात आली. या वेळी अनेक शिवसैनिकांची उपस्थिती होती. कारखानदारांनी अद्यापही उसाचा भाव घोषित केलेला नाही. माजलगाव सहकारी साखर कारखान्याने उसाला तीन हजार रुपये हमीभाव द्यावा या प्रमुख मागणीसाठी आज शिवसेनेने कारखान्यासमोर जागरण-गोंधळ करून तीव्र निदर्शने केली.