नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा 23 टक्क्यावर

नाशिक, दि. 19, मे - वाढत्या उन्हाच्या झळांबरोबरच टंचाईच्या झळाही तीव्र होऊ लागल्या आहेत. त्यामुळे धरणांतील पाणीसाठाही दिवसेंदिवस घटत चालला आहे. आजमितीस जिल्ह्यातील 17 मध्यम, 7 मोठ्या अशा एकूण 24 प्रकल्पांत 23 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. माणिकपुंज धरण कोरडेठाक झाले असून पाच धरणांमध्ये तर 0 ते 10 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. 


जिल्ह्यातील धरणांची पाणी साठवण क्षमता 65 हजार 814 दलघफू इतकी आहे. सद्यस्थितीत धरणांत 15 हजार 151 दलघफू एवढाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. याच पाण्यावर जिल्हावा सियांची पुढील महिन्याची भिस्त अवलंबून आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणांत 4 टक्के अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी 19 टक्के पाणीसाठा होता. पालखेडमधून पाणी सोडल्यास धरणांची पातळी आणखी खालावणार आहे. तर गौतमी गोदावरी, वाघाड, भावली, मुकणे, भोजापूर, नागासाक्या धरणांतील पाणीसाठा 0 ते 10 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
गंगापूर समूहात 38 टक्के पाणी 
शहरवासियांची तहान भागवणा-या गंगापूर धरणात 34 टक्के, काश्यपी 88 टक्के, गौतमी गोदावरी 10 टक्के तर आळंदीत 16 टक्के असा समूहात एकूण 38 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच कालावधीत समूहात 29 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. 
धरण पाणीसाठा टक्केवारी
गंगापूर 34, काश्यपी 88, गौतमी गोदावरी 10, आळंदी 16, पालखेड 37, करंजवण 26, वाघाड 5, ओझरखेड 17, पुणेगाव 13, तीसगाव 12, दारणा 43, भावली 8, मुकणे 8, वालदेवी 34, कडवा 15, नांदूरमध्यमेश्‍वर 37, भोजापूर 1, चणकापूर 26, हरणबारी 27, केळझर 22, नागासाक्या 6, गिरणा 16, पुनद 33