हरियाणात केजरीवालांना तरुणाने बूट फेकून मारला!
रोहतक, दि. 02 - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हरियाणातील रोहतक येथील सभेत बूट फेकून मारल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात केजरीवाल सुरक्षित असून पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतलं आहे. केजरिवालांनी मात्र या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. मोदींवर आपण टीका केल्याने त्यांच्या समर्थकांनी बूट फेकला. आम्हीही हे करु शकतो, मात्र आमचे संस्कार आम्हाला तशी परवानगी देत नाहीत, असं केजरीवाल यांनी ट्विटरद्वारे म्हटलं आहे. बूट फेकला किंवा सीबीआय रेड टाकली तरीही आपण नोटाबंदी घोटाळा आणि सहारा, बिर्ला प्रकरणाबाबत सांगतच राहिल, असंही केजरीवाल म्हणाले.
दरम्यान केजरीवालांवर काही दिवसांपूर्वी सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने राजस्थानातील बिकानेरमध्येही शाहीफेक झाली होती. तर एका पत्रकार परिषदेमध्येही त्यांच्यावर बूट फेकण्यात आला होता. ऑड-ईव्हन फॉर्मुल्याच्या निर्णयाविरोधात हा बूट फेकल्याचं बोललं जात होतं.