नाशिक बाजारसमितीच्या सभापतीपदी शिवाजी चुंभळे
नाशिक, दि. 21, जुलै - नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. यात सभापतीपदी शिवाजी चुंभळे यांची तर उपसभापतीपदासाठी संजय तुंगार यांची निवड झाली. न्यायालयीन दाव्यामुळे माजी खासदार देविदास पिंगळे यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर 15 संचालकांनी सभापती निवडीसाठी विशेष सर्वसाधारण सभेची मागणी केली होती. त्यानंतर आज विशेष सभा बोलावून निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काम पहिले.