रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनची 26 नोव्हेंबरला वार्षिक सभा

रत्नागिरी, दि. 11, नोव्हेंबर - रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर होणार आहे. सभासदांना हव्या असलेल्या माहितीबाबत 18 नोव्हेंबरपूर्वी लेखी सूचना असोसिएशनच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सायंकाळी 4.30 ते 7.30 वा. या वेळेत घ्यावी. आयत्या वेळी माहिती देणे शक्य होणार नाही, असे सूचित करण्यात आले आहे. सभेत इतर विषयांबरोबरच 2014 ते 2017 मधील सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळाडूंचा सत्कार केला जाणार असून आगामी पाच वर्षांसाठी नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात येणार आहे.