Breaking News

नियम मोडणार्‍या वाहनधारकांविरोधात कारवाईसाठी दोन पथके

औरंगाबाद, दि. 24, सप्टेंबर - सध्या प्रादेशिक परिवहन विभागात मनुष्यबळ कमी जरी असले तरी नियमाचे उल्लंघन करणार्‍या वाहन धारकांविरूध्द कारवाई  करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने दोन पथके कार्यरत असून दैनदिन हे पथक कारवाई करीत असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी सतिश  सदामते यांनी दिली. विना हेल्मेट, सिटबेल्ट न लावणे, वाहनांची कागदपत्रे सोबत न बाळगणे, पियुसी ,यासह इन्शुरन्स आदी बाबींची तपासणी करण्यात येत आहे.  यासाठी कार्यालयाच्या वतीने स्वतंत्र दोन पथके तयार करण्यात आली आहे. या दोन्ही पथकात दोन दोन कर्मचारी आणि अधिकारी यांचा समावेश आहे.