Breaking News

अन्यायाविरुद्ध लढा दिलेल्या, साहसी मुली व महिलांना ठाणे महापालिकेच्या वतीने ’शौर्य पुरस्कार’

ठाणे, दि. 26, सप्टेंबर -  ठाणे महापालिकेच्या समाज विकास विभागाकडील महिला -बालकल्याण योजने अंतर्गत सन 2017 -18 या आर्थिक वर्षात साहसी व  अन्यायाविरूद्ध लढा दिलेल्या मुली व महिलांसाठी शौर्य पुरस्कार देण्यात येणार असून संबंधितांनी या पुरस्कारासाठी महापालिकेच्या समाज विकास विभागाकडे अर्ज  सादर करण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे .
समाज विकास विभागाच्यावतीने महिला व बालकल्याण योजने अंतर्गत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जाणार आहेत . महिला व बाल विकासासाठी  महापालिकेच्यावतीने सन 2017-18या आर्थिक एकूण पंधरा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे .
ठाणे महापालिका क्षेत्रात अन्यायाविरुद्ध लढा दिलेल्या ,साहसी काम केलेल्या मुली व महिला यांच्या कार्याची विशेष दखल घेऊन त्यांना शौर्य पुरस्कार देऊन  गौरवण्यात येत आहे. तरी संबंधित मुली व महिलांनी आपण केलेल्या साहसी कार्याच्या तपशीलासह दिनांक 10 ऑक्टोबर 2017 पर्यंत महापालिकेच्या समाज  कल्याण विभागाकडे अर्ज सादर करावा . या योजनेचा लाभ घेणार्‍या अर्जदाराने दिनांक 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत धाडसी कार्य केले  असणे आवश्यक आहे. तरी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.