Breaking News

नागपुरात पकडला 314 किलो गांजा; पोलिसांनी जप्त केला 40 लाखांचा मुद्देमाल

नागपूर, दि. 26, सप्टेंबर -  अंमली पदार्थ तस्करीचा भांडाफोड करण्यात आज, सोमवारी नागपूर पोलीसांना मोठे यश मिळाले आहे.अंमली पदार्थ विरोधी पथक व  गुन्हे शाखेने सावनेर मार्गाने ट्रकने नेण्यात येणार तब्बल 314 किलो गांजा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी एकूण 39 लाख 45 हजार 860 रुपयांचा मुद्देमाल  जप्त केला आहे.
याबाबत हाती आलेल्या अधिकृत माहितीनुसार आयशर ट्रक (क्र एचआर 69- 3790) अंमल पदार्थाचा मोठा साठा घेवून येणार असल्याची गुप्त माहिती अंमली  पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. सदर ट्रक कोराडी मार्गावरून जाणार असल्याची माहितीही पथकाला मिळाली होती.मात्र बराच वेळ सापळा रचल्यानंतरही ट्रक  मार्गावर न दिसल्याने त्याचा शोध सुरु केला.सावनेर नागपूर हायवे कोराडी तलावाजवळ पोलिसांना हा संशयित आयशर ट्रक पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी  ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये मागे कोणताच माल नव्हता मात्र ट्रकमधून प्रचंड उग्र वास येत होता. दरम्यान ट्रकच्या मागील माल ठेवण्याच्या जागेवर लोखंडी  रकाने तयार करून प्लायवूडने पॅक केल्याचे अंमली विरोधी पथकाला आढळून आले.पोलिसांनी प्लायवूड काढले असता त्यांना प्लास्टिक बॅगमध्ये गांजाचे पार्सल बॅग  आढळून आल्यात.
सुमारे 31 लाख 45 हजार 360 रुपयांचा 314 किलो गांजा पकडताना ट्रकसह 39 लाख 45 हजार 860 रुपयांचा मुद्देमाल अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त  केला.पांढुर्णाजवळ सदर ट्रकची स्थानिक पोलिसांनी तपासणीही केली होती. मात्र तेव्हा गांजा तस्कर त्यांना गुंगारा देण्यास यशस्वी झाले होते. मात्र अंमली पदार्थ  विरोधी शाखेने कसून तपास केल्यानंतर गांजाची ही मोठी खेप पकडण्यात यश मिळाले.