Breaking News

...तर विद्यार्थी निश्चित यशस्वी : डॉ. मालपाणी


निराशेला स्वतःजवळ फटकू देऊ नका. स्वत:च्या मनातील निश्चय दृढ करा. निरंतर प्रयत्न करणे हेच सॉफ्ट स्किलचा उद्देश्य आहे. विद्यार्थ्याने आपल्या मनातील न्यूनगंड स्विकारुन त्यावर मात करत सकारात्मकतेची उर्जा निर्माण केल्यास विद्यार्थी निश्चित यशस्वी होऊ शकेल, असे प्रतिपादन डॉ. संजय मालपाणी यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रायोजित व संगमनेर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सॉफ्ट स्किल’ कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. के. देशमुख, सॉफ्ट स्किल विभागाचे समन्वयक डॉ. जितेंद्र पाटील, सहसमन्वयक प्रा. ऋषिकेश मालाणी, प्रा. श्रीहरी पिंगळे आदी उपस्थित होते.