आमदारांची पगार वाढ मात्र अपंगांच्या पदरी उपेक्षा - आ. बच्चू कडू
पुणे, दि. 26, सप्टेंबर - गेल्या अनेक वर्षांपासून अपंग कर्मचारी आणि इतर व्यक्तींच्या मानधनाचा प्रश्न रखडलेला आहे. अनेक वर्ष लढा देऊनही त्यांच्या टक्केवारीत वाढ झाली नाही, मात्र आमदारांच्या पगारात भरीव वाढ करण्यात आली. आपल्या देशात अपंगांच्या वाटेला नेहमी उपेक्षाच आली असल्याची खंत आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली.
विश्वमाता फाउंडेशन आयोजित इनोव्हेटीव्ह टिसर्च नॅशनल अवॉर्ड वेळी ते बोलत होते. यावेळी विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम केलेल्या शिक्षकांचा सन्मान फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला.
आ. कडू म्हणाले, आपल्याकडे धार्मिक उत्सव साजरा करते वेळी आर्थिक बाबींकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र समाजहिताचे काम करताना प्रत्येक वेळी आखडता हात करण्याची प्रथा पडली आहे. सध्या नवरात्रौत्सव सुरु आहे. या निमित्ताने हा उत्सव साजरा करणा-या महिला मंडळांनी प्रत्येकी एक विधवा दत्तक घेतल्यास देशतील विधवा पुनर्वसनाचा प्रश्न सुटणार आहे. मात्र अशा प्रकारचे सामाजिक कार्य करण्याचे भान आणि बदलाव कोणालाच मान्य होणार नाही, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
शिक्षकांचे मूल्य कमी होत असून त्याची जागा इंटरनेट आणि साशल मिडीयाने घेतली आहे. भविष्यात याची मोठे गंभीर परिणाम होणार असल्याच्या भावना पुरस्कार स्विकारताना अरुण घावत यांनी व्यक्त केल्या. सूत्रसंचालन अजय धोटे यांनी केले.

Post Comment