राष्ट्रपती निवडणुकीत भाजपने हिंदुत्ववादी नेत्याला उमेदवारी देऊ नये - शरद यादव
नवी दिल्ली, दि. 05 - भाजपने जर कट्टर हिंदुत्ववादी व्यक्तीला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवारी दिली तर विरोधी पक्ष आपला उमेदवार उभा करेल, असे संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांनी आज येथे स्पष्ट केले .
जुलै महिन्यात होणा-या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाकडून शरद यादव हे संभाव्य उमेदवार असल्याचे मानले जात आहे. सत्ताधारी पक्षाकडून घटनेवर विश्वास ठेवणार्याला उमेदवारी दिल्यास सर्वांची सहमती होऊ शकते, असेही यादव म्हणाले.
विरोधी पक्षाकडूनही उमेदवार उभा करण्यासाठी चर्चा सुरू आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नुकत्याच दिलेल्या भोजन समारंभात समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रीय जनता दल, संयुक्त जनता दलासह 17 राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकही आक्रमक असल्याचे चित्र आहे.

Post Comment