Breaking News

सावेडी बस स्थानक सुरू करण्याच्या मागणीसाठी राकाँ करणार उपोषण

अहमदनगर, दि. 08, नोव्हेंबर - सावेडी उपनगरातील नागरिकांच्या सोयीसाठी बसस्थानक तात्काळ सुरु करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कुमारसिंह  वाकळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने विभाग नियंत्रक नितीन मैंद यांना निवेदन दिले. मैंद यांनी आठ दिवसात सदर प्रश्‍ना संदर्भात सावेडी बसस्थानकाचे सर्व्हे क्षण करण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, साहेबान जहागीरदार, अमित खामकर, वैभव ढाकणे, नगरसेवक संभाजी पवार आदी  उपस्थित होते.
सावेडी बसस्थानक बंद असल्याने स्थानिक नागरिकांकडून ते सुरु करण्यास वारंवार मागणी होत आहे.येथील बसस्थानक स्थानिक नागरिकांच्या सोयीचे व एस.टी.महामंडळाच्या  फायद्याचे आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर व सुरक्षित होणार आहे.मात्र जाणीवपुर्वक सावेडी बसस्थानक सुरु करण्यासाठी उपाययोजना केल्या जात नसून लोकभावनेचा  एस.टी.महामंडळ प्रशासनाकडून आनादर होत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.या भागातील नगरसेवक कुमारसिंह वाकळे पाटील यांनी कार्यालयास केलेल्या पत्रव्यवहाराला उत्तर  मिळाले नसून या निवेदनाची गांभीर्याने दखल न घेतल्यास आ.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली एस.टी. महामंडळाच्या विभाग नियंत्रक कार्यालया समोर आमरण उपोषणाला  बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.