Breaking News

नेमबाजी स्पर्धेत गुलाब भोसले यांचे यश

सातारा, 10 - शिवराज ससे शुटींग अकॅडमीच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय रायफल व पिस्टल नेमबाजी स्पर्धेत सिनियर सिटीझन गटात गुलाब भोसले यांनी 200 पैकी 161 गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावला. गुलाब भोसले हे आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या स्वीय सहाय्यक असून या यशाबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी त्यांचे अभिनंदन केले. 
शिवराज ससे शुटींग अकॅडमी येथे झालेल्या स्पर्धेत 40 वर्षावरील नागरिकांसाठी नेमबाजी स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत गुलाभ भोसले यांनी तब्बल 30 वर्षांनंतर नेमबाजी केली. तरीही त्यांनी स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. 30 वर्षांपुर्वी भोसले यांनी दिल्ली येथे एनसीसी मध्ये दुसरा क्रमांक मिळवला होता. 
सन 1986 मध्ये दिल्ली येथे झालेल्या 26 जानेवारीच्या परेडमध्येही सहभाग घेण्याची संधी भोसले यांना मिळाली होती. ज्युनियर आणि सिनियर विभागातून 26 जानेवारीला दिल्ली येथे परेडमध्ये सहभाग मिळालेले भोसले हे एकमेव व्यक्ती आहेत. तसेच आंतर विद्यापिठ नेमबाजी स्पर्धेतही गुलाब भोसले यांनी दुसरा क्रमांक पटकावला होता. नेमबाजी स्पर्धेत यश मिळवल्याबद्ल गुलाब भोसले यांचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्री. छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री. संजीवराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे राजेंद्र चोरगे, प्रदीप ससे, शिवराज ससे, विजय पवार, कर्तव्य सोशल ग्रुपचे विजय देशमुख, फिरोज पठाण, बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. विक्रम पवार आदींनी अभिनंदन केले.