Breaking News

पाकिस्तानने केली 5 हजारपेक्षा अधिक संशयित दहशतवाद्यांची बँक खाती बंद

इस्लामाबाद, दि. 05 - पाकिस्तानने 5 हजारपेक्षा अधिक संशयित दहशतवाद्यांची बँक खाती बंद केली आहेत. तसेच त्यांची ओळखपत्र रद्द करून त्यांच्यावर कडक  कारवाई केली आहे. पाकिस्तानमधील पेशावर येथे 2014 साली झालेल्या हल्ल्यानंतर 20 मुद्यांवर आधारित राष्ट्रीय कार्य योजना (एनपी) लागू करण्यात आली होती.  याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली, असे एका अधिका-याकडून सांगण्यात आले. ते म्हणाले की, राष्ट्रीय कार्य योजनेद्वारे दहशतवादी आणि दहशतवादी संघटनेच्या  आर्थिक व्यवहारांवर बंदी घालता येते, असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान पेशावरमध्ये झालेल्या हल्ल्यात 150 पेक्षा अधिक ठार झाले होते. यात शाळकरी मुलांचा समावेश होता.