केरळमध्ये पक्ष कार्यकर्त्यांना लक्ष्य करणा-यांना माफ करणार नाही - अमित शाह
तिरुवनंतपुरम, दि. 05 - डाव्या विचारसरणींच्या पक्षांकडून भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या केल्या जात आहेत. असे करून ते आम्हाला रोखू शकत नाहीत. कार्यकर्त्यांना लक्ष्य करणा-यांना माफ केले जाणार नाही, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज येथे सांगितले.
शाह तीन दिवसांच्या केरळ दौ-यावर असून त्यांनी आज येथे पक्षाच्या नव्या कार्यालयाच्या इमारतीचे भूमीपूजन केले. या कार्यालयाचे नामकरण ॠमरारजी भवन’ करण्यात आले. राज्यात अनेक वर्षे कार्यकर्ते मेहनत करत आहेत. संपूर्ण देशभरात पक्षाने कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर 2019 पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात भाजपचे अत्याधुनिक कार्यालय सुरू केले जाईल. ज्या गरीबाकडे पायाभूत सुविधा नव्हत्या. त्याला केंद्र सरकारने 106 योजनांतर्गत लाभ दिला आहे. अशा कुटुंबांसाठी अच्छे दिन आले आहेत. मात्र आघाडी सरकारच्या काळात गरीब व मागास समाजातील लोकांकडे दुर्लक्ष करण्यात आले, अशी टीका शाह यांनी केली.