महाराष्ट्रात ‘फुटबॉल फिव्हर’निर्माण करणार - क्रीडा मंत्री विनोद तावडे
पुणे, दि. 29 - आंतराष्ट्रीय फुटबॉल संघटनेतर्फे (फिफा) 6 ते 28 ऑक्टोबर,2017 या कालावधीत 17 वर्षाखालील खेळाडूंच्या फुटबॉल विश्व चषक स्पर्धेचे भारतामध्ये आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात नवी मुंबई येथील डी.वाय.पाटील स्टेडीयम येथे या स्पर्धेतील पाच सामने खेळविण्यात येणार आहेत. या स्पर्धेच्यानिमित्ताने फुटबॉल खेळ लोकप्रिय व्हावा यासाठी, महाराष्ट्रात फुटबॉल फिव्हर निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण तथा क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी आज येथे केले.
17 वर्षाखालील खेळाडूंच्या फुटबॉल विश्व चषक स्पर्धेच्यानिमित्ताने येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात क्रीडा विभागाचे वरिष्ठ अधिकारी, क्रीडा संघटक, आयोजन समिती सदस्य यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अधिकार्यांना मार्गदर्शन करताना क्रीडा मंत्री विनोद तावडे बोलत होते. यावेळी क्रीडा मंत्री तावडे म्हणाले, शालेय विद्यार्थ्यांमध्ये फुटबॉल खेळाविषयी जनजागृती व्हावी यासाठी, ज्या शाळांमध्ये फुटबॉल खेळ प्राधान्याने खेळण्यात येतो, त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना यासंदर्भात अधीक मार्गदर्शन करण्यात येईल. ज्या शाळांमध्ये हा खेळ खेळण्यात येत नाही, त्या शाळांवर विशेष लक्ष देऊन तेथील विद्यार्थ्यांनी फुटबॉल खेळाकडे वळावे यासाठी क्रीडा विभागाने विशेष प्रयत्न करावे. स्पर्धेच्यानिमित्ताने सुमारे 20 हजार शाळांमध्ये प्रत्येकी पाच असे एकूण 1 लाख फुटबॉलचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील जवळपास 7 हजार क्रीडा शिक्षकांना यामध्ये सहभागी करुन घेण्यात येणार आहे. यासोबत 13 वर्षाखालील आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन, 29 ऑगस्ट या राष्ट्रीय क्रीडा दिनी 10 लाख मुला-मुलींनी फुटबॉल खेळणे, विश्वचषक स्पर्धेच्या कालावधीत सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये फुटबॉल फेस्टीवलचे आयोजन करणे आदी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. प्रधानमंत्री यांनीसुध्दा या स्पर्धेच्यानिमित्ताने सर्व तरुणांना फुटबॉल खेळाशी जोडण्याबाबत आवाहन केले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
बैठकीला क्रीडा विभागाच्या उपसचिव चारुशिला चौधरी, सहसंचालक नरेंद्र सोपल, क्रीडा उपसंचालक आनंद व्यंकेश्वर, उपसंचालक चंद्रकांत कांबळे, सहायक संचालक व नेमबाज नवनाथ फरताडे, राज्यातील क्रीडा उपसंचालक, जिल्हा क्रीडा अधिकारी, क्रीडा संघटक आशिष पेंडसे उपस्थित होते.

Post Comment