मेहकर जि.प., पं.स.मध्ये ‘गढ आला पण सिंह गेला’
दे.माळी सर्कलमध्ये ‘प्रताप’ घडता घडता राहिला...
खासदार प्रतापराव जाधव यांचे चिरंजीव ॠषी जाधव पराभूत
बुलडाणा, दि. 24 - जि.प. व पं.स.चे धक्कादायक निकला आज जाहीर झाले. यामध्ये 6 जि.प. व 12 पं.स. सर्कल पैकी 4 सेना 1 काँग्रेस व 1 भाजपा तर 12 पं.स.पैकी 9 सेना व 2 काँग्रेस 1 भाजपा ला जागा मिळविता आली. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या जि.प. दे.माळी सर्कल चे खा.प्रतापराव जाधव यांचे पुत्र ॠषी जाधव यांचा पराभव दे.माळी सर्कलचे भाजप चे उमेदवार संजय वडतकर यांनी करीत ‘प्रतापराव यांच्या गडाला खिंडार पाडले. गड आला पण सिंह गेला अशी अवस्था नगर पालिके नंत जि.प., पं.स.मध्ये पण झाली असून एकिकडे शिवसेनेच्या अजनी बु. जि.प.चे उमेदवार आशिष दिलीपराव रहाटे यांनी 4760 मतांनी विजय प्राप्त केला असून आशिष रहाटेच्या माध्यमातू दिलीपराव रहाटे यांची 26 वर्षा नंतर शिवसेना जागृत राहली. अटीतटीच्या सोनाटी सर्कल मधून मनिषा संतोष चनखोरे यांनी विजय प्राप्त केला तसेच डोणगांव जि.प.चे सुबोध सावजी यांचे पुत्र शैलेश सावजी यांचा पराभव करीत राजेंद्र सदाशिव पळसकर यांनी विजय प्राप्त केला. जानेफळ येथील मनिषा नितीन पवार यांनी तालुक्यात काँग्रेसची पत राखत विजय प्राप्त केला. घाटबोरी जि.प.सेनेचे तेजराव राठोड यांनी विजय प्राप्त केला असून दे.माळी ंप.स.शिवप्रसाद मगर भाजपा, सौ.वर्षा मवाळ सेना, शेलगांव देशमुख जया कैलास खंडारे सेना, अजनी बु.प्रतिमा वानखेडे सेना, डोणगांव पं.स.निंबाजी श्रीराम पांडव, वायगांव पं.स.सौ.मिना म्हस्के सेना, घाटबोरी पं.स.सौ.निता दिलीपराव देशमुख सेना, सोनाटी पं.स.राजु माणिकराव घनवट सेना, जानेफळ सौ.रुख्मीना अशोक उबाळे काँग्रेस, हिवरा खु.पं.स.रमेश धोत्रे काँग्रेस, दे.साकर्शा पं.स.सुपजी पायघान सेना, पिं.माळी सौ.रेवती काळे सेना, हे उमेदवार विजयी झाले आहेत.मेहकर तालुक्यात शिवसेना खासदार आमदार यांचे वर्चस्व होते पण मतदारांनी या वेळी बर्याच ठिकाणी तडजोड करीत सेनेला विजय प्राप्त करून दिला. एकंदर मेहकर तालुक्यात काँग्रेस रा.कॉ.तसेच भाजप ला चिंतनाची गरज आहे. तर सेना भाजपाची युती जरी तुटली असली तरी दोन्ही पक्षाचा एकंदर या जि.प. व पं.स.निवडणूकीत मात्र बराच फायदा झाला असून निवडणूक संपली निकाल लागले आणि सेना भाजपा चा अबोला संपतो की काय? या कडे सर्व जनतेचे लक्ष लागून आहे. असो संपूर्ण निकालाची प्रक्रिया शांततेत पार पडली.
Post Comment