खडके ग्रामस्थांच्या वतीने आ. राजळे यांच्या अभिनंदनाचा ठराव

आ. मोनिका राजळे यांच्या प्रयत्नातून खडके ग्रामपंचायतीला नवीन इमारतीसाठी जनसुविधा या योजनेअंतर्गत नवीन ग्रामपंचायत कार्यालयासाठी 9 लक्ष रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे खडके ग्रामस्थांच्या वतीने आ. मोनिका राजळे यांच्या सत्काराचा ठराव गावकर्‍यांच्या वतीने मांडण्यात आला होता, तो सर्वानुमाते संमत करण्यात आला.

यावेळी सरपंच मिनाबाई मोहन डमाळे, उपसरपंच नारायण बन्सी पाखरे, सदस्य बर्द्रीनाथ कर्‍हे, शहाजी घोडके, शिभाबाई आंधळे, आशा पाखरे, मीरा पाखरे आदी सदस्य यावेळी उपस्थित होते.
गावाच्या ग्रामविकासामध्ये ग्रामसचिवालय अद्यावत असणे गरजेचे आहे. यामुळे ग्रामविकासाला चालना मिळत असते. या नवीन इमारतीमुळे खडके गावाचा विकास होण्यास मदत होणार आहे. असे मत सरपंच मीनाबाई डमाळे यांनी व्यक्त केले.