निवडणुकी दरम्यान घडलय - बिघडलय घटनांचा मागोवा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागांवर कुणाचीही सत्ता येवो, कुणाचीही आघाडी होवो अथवा युती होवो आता सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे नेत्यांनी लक्ष दिले नाही तर भविष्यात मतदार काय करु शकतात याची सर्वांनाच चाहुल आली आहे. यंदाच्या निवडणुकीत नोंटा बंदीचा फटका बसेल असे वातावरण होते. नोटाबंदीने शेतकरी हवालदिल झाला होता. ऐन सुगीच्या दिवसात नोटाबंदीने शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरीकांनाही मोठी अडचण केली होती असो.
मुंबईत शिवसेनेचा भगवा फडकेल असे वातावरण होते. तर जिल्हयात राष्ट्रवादी आणि सेना चांगल्या जागा मिळवतील असे बोलले जात होते परंतु आता आघाडी असो वा बिघाडी एकमेकांवर आरोप करणार्यांना एकत्र येण्याशिवाय पर्यायच नाही. अशी परस्थिती निर्माण झाली आहे.
मतदान पुर्ण न होताच निघाले...
तालुक्यातील एका उमेदवाराने मतमोजनी सुरु असताना निकाल पुर्ण होण्या अगोदरच म्हणजे नोटांची मतमोजणी होण्या आगोदरच येथुन आपला काढता पाय घेतला, परंतु हा उमेदवार घरी गेल्यानंतर विजयी झाला.
पारनेरमध्ये दिगज्जांना धक्का
पारनेरमध्ये दिग्गज उमेदवारांनी अर्ज भरुन आपनच निवडुन येणार अशा वल्गना केल्या होत्या. त्यांनाही या निवडणुकीत मतदारांनी आपला कौल न दिल्याने पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
अनेक वर्षांनंतर गुलाल अंगावर
पाथर्डीमध्ये एका दिग्गज नेत्याने अनेक वर्षे एकच पक्षात एकनिष्ठ राहून दुसर्या पक्षात पदार्पण केले या नेत्याने तब्बल 15 वर्षांनतर गुलाल उडवल्याची चर्चा रंगली होती. तालुक्यातील अनेकांनी या नेत्याला भरभरुन मतदान केल्याने त्यांना विजय गाठता आला.
Post Comment