Breaking News

इस्तांबूल विमानतळावर आत्मघातकी हल्ला, 36 ठार

इस्तांबूल, दि. 29 -  तुर्कीमधील प्रमुख शहर इस्तांबूल येथील आतातुर्क आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन आत्मघातकी हल्ला घडवून आणले. या स्फोटामध्ये आतापर्यंत 36 जणांचा मृत्यू झाला तर 140 हून अधिक जण जखमी आहेत. तुर्कीच्या स्थानिक वेळेनुसार मंगळवारी संध्याकाळी हा हल्ला झाला.
आतातुर्क विमानतळावरुन मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक होते. काही अज्ञात हल्लखोरांनी विमानतळाबाहेर तैनात असलेल्या
सुरक्षारक्षकांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या हल्लेखोरांनी विमानतळाच्या कार पार्किंगमध्ये हे स्फोट घडवले.
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. अनेक प्रवासी आपला जीव वाचवण्यासाठी जमिनीवर झोपले.
दहशतवादी संघटना आयसीसने हा स्फोट घडवून आणल्याचा दावा तुर्कीने केला आहे.दरम्यान या हल्ल्यातील मृतांचा आकडा 50पर्यंत जाईल अशी भीती तुर्की सरकारच्या सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली.
दरम्यान अभिनेता हृतिक रोशन हल्ल्यातून थोडक्यात बचावला असून आत्मघाती हल्ल्यापूर्वी काही वेळ आगोदरच विमानळावरून इकॉनॉमी क्लासने भारतात परतल्याचे हृतिकने ट्विटरवर म्हटले आहे. हृतिक हा त्याची दोन मुले रेहान आणि रिधान यांच्यासह स्पेन आणि आफ्रिकेत सुट्टीसाठी गेला होता.  तो इस्तंबूल विमानतळावरून भारतात परतला.
अतातुर्क विमानतळावर स्फोट होण्यापूर्वी काही वेळ मी विमानतळावरच होतो. या मोठ्या हल्ल्यातून मी थोडक्यात बचावलो. इस्तंबूलहून भारतात परतण्यासाठी मी विमानतळावर आलो होतो. पण, काही कारणांमुळे माझे कनेक्टिंग विमान चुकले. भारताकडे जाणारे अन्य विमान दुसर्‍या दिवशी असल्याने मी इकॉनॉमी क्लासने निघालो. त्यानंतर काही वेळातच हे आत्मघाती हल्ले झाल्याचे त्याने ट्विट केले आहे.