जामखेडमध्ये भाजपचे वर्चस्व
। कमळ फुलले । पालकमंत्री राम शिंदे यांचे वर्चस्व कायम
अहमदनगर, दि. 24 - जिल्हा परिषदेच्या व पंचायत समिती निवडणुकीत भा ज पा ने दोन जिल्हा परिषद गट व चार पंचायत समिती गणात एक हाती सत्ता मिळाली असुन विरोधाकांना खातेही उघडता आले नाही सहा च्या सहा ही जागांवर कमळ फुलले.या मुळे नगरपालिकेच्या पराभवाचा वचपा काढत पालकमंत्री प्रा राम शिंदे यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.जामखेड जिल्हा परिषद पंचायत समिती च्या निवडणुकीच्या मतमोजणीत पहिल्या फेरीपासूनच भाजपा ने अघाडी घेऊन विजयाचीच नोंद केली दोन्ही गट तर चारही गणावर सहापैकी सहा जागा भाजपा ने जिंकून बाजी मारली.खर्डा गटातुन भा ज पा च्या सौ वंदना अनिल लोखंडे 3411 मतांनी विजयी झाले त्यांनी राष्ट्रवादी च्या हिराबाई ज्ञानदेव लोंढे यांचा पराभव केला.तसेच जवळा जिल्हा परिषद गटातून भाजपचे सोमीनाथ पाचरणे हे 1917 मतांनी विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी चे उमेदवार बबन तुपेरे यांचा पराभव केला.
साकत गणातून राष्ट्रवादी चे माजी सभापती संजय वराट यांचा पराभव करून विद्यमान सभापती भगवान मुरूमकर यांनी 981 मतांनी विजयी झाले.खर्डा गणात भा ज पा चे तालुका अध्यक्ष रवी सुरवसे यांच्या पत्नी मनिषा रविंद्र सुरवसे ह्या 1490 मतांनी विजयी झाल्या त्यांनी राष्ट्रवादी च्या सौ संजीवनी वैजिनाथ पाटील यांचा पराभव केला.या मध्ये काँग्रेस च्या महीला तालुका अध्यक्षा ज्योती शिरीष गोलेकर व राष्ट्रीय समाज पक्षाचे सुळ कस्तुराबाई मारुती यांचाही पराभव झाला.हळगाव गणातून भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुर्यकांत मोरे यांच्या पत्नी राजश्री सूर्यकांत मोरे या 643 मतांनी विजयी झाल्या असून त्यांनी अरणगावचे माजी सरपंच संतोष निगुडे यांच्या पत्नी राष्ट्रवादीच्या शकुंतला संतोष निगडे यांचा पराभव केला.तसेच पिंपरखेड चे माजी सरपंच बापूराव ढवळे यांची भावजई स्वप्ना राजेंद्र ढवळे व काँग्रेस चे माजी उपसभापती अंकुश ढवळे यांच्या पत्नी सौ शोभा अंकुश ढवळे यांनाही या गणात पराभवाला सामोरे जावे लागले.
सभापतीपदासाठी राखीव असलेल्या जवळा गणात भा ज पा चे सुभाष अव्हाड (सर) यांनी 1306 मतांची आघाडी घेत त्यांनी राष्ट्रवादी चे उमेदवार गोरख भवाळ यांच्या सह शिवसेनेचे राजेंद्र पाचारे व आर पी आय चे जिल्हाध्यक्ष व काँग्रेस कडुन उमेदवारी केलेले सुनील साळवे यांनाही दारुन पराभवाला सामोरे जावे लागले.
उमेदवारांना पक्षनिहाय पडलेली आकडेवारी खालील प्रमाणे
* जवळा गट
भाजप विजयी उमेदवार सोमीनाथ जगन्नाथ पाचारणे 10705
राष्ट्रवादी काँग्रेस बबन विष्णू तुपेरे -8734
शिवसेना कानडे पुष्पा मछिंद्र -5910
काँग्रेस खरात मधुकर माधव -3055
जवळा गण
भाजप विजयी उमेदवार आव्हाड सुभाष बापू -6054
राष्ट्रवादी काँग्रेस भावाळ गोरख विश्वनाथ -4919
शिवसेना पाचरे राजेंद्र रामा -1514
काँग्रेस सुनील अजिनाथ साळवे -1507
* हळगाव गण
भाजप विजयी उमेदवार जयश्री सूर्यकांत मोरे -4914
राष्ट्रवादी काँग्रेस निगुडे शकुंतला संतोष -4260
शिवसेना ढवळे स्वप्ना राजेंद्र -4209
काँग्रेस ढवळे शोभा अंकुश -1790
खर्डा गट
भाजप विजयी उमेदवार लोखंडे वंदना अनिल -12752
राष्ट्रवादी काँग्रेस लोंढे हिराबाई ज्ञादेव -9169
शिवसेना नवगिरे राधा सुरेश -1806
काँग्रेस पोळ सीमा शिवाजी -2994
अपक्ष राजगुरू आशाबाई गोरखनाथ -2914
खर्डा गण
भाजप विजयी उमेदवार सुरवसे मनीषा रवींद्र -6549
राष्ट्रवादी काँग्रेस पाटील संजीवनी वैजिनाथ -5059
शिवसेना जोरे सुमन रामहरी -398
काँग्रेस गोलेकर ज्योती शिरीष -682
साकत गण
भाजप विजयी उमेदवारविद्यमान सभापती डॉ भगवान सदाशिव मुरूमकर -5532
राष्ट्रवादी काँग्रेस वराट संजय रावसाहेब -4550
शिवसेना माने बापूसाहेब प्रल्हाद -1272
काँग्रेस प्रा वराट अरुण देवराव -2186
Post Comment