मूक मोर्चे हे संविधान विरोधीः वामन मेश्राम
‘एकच पर्व बहूजन सर्व’ चा नारा देत बुलडाण्यात उसळला जनसागर
बुलडाणा, दि. 30 - एकच पर्व बहुजन सर्व असा नारा देत बहूजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी शहरासह जिल्ह्यातील बहुजन ओबीसी, मुस्लिम, बारा बलूतेदार समाजाचा जनसागर आज बुलडाण्यात उसळला होता. लहानांपासून मोठ्यापर्यंत हाती झेंडा आणि फलक घेऊन एका शिस्तीत मोर्चेकरी येथील जयस्तंभ चौकात जमा होत होते. बलात्काराच्या आरोपींना कडक शासन करा, अॅट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी झालीच पाहिजे, दलित आदिवासी, बहुजन तरुणांना शिष्यवृत्ती लागू झालीच पाहिजे, महिलांना सुरक्षा मिळालीच पाहिजे, ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा, यासह विविध मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. निळे, पिवळे, हिरवे, लाल, पांढरे झेंडे आणि एकच साहेब, बाबासाहेब, जय भिम, जय भिम, हम भी आये लाखोंसे, तुम भी देखो आखोंसे या मोर्चेकर्यांच्या घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधले होते.स्थानिक जयस्तंभ चौक परिसरात दुपारी 1 वाजेच्या सुमारास मोर्चाच्या जाहीर सभेला सुरवात झाली. जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटानांच्या पधाधिकार्यानी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकातून प्रा. सदानंद माळी यांनी बहुजन क्रांती मोर्चाचा उद्देश मांडला. एकमेकांचा हात धरण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत त्यामुळे तोडा फोडा या नीतीला यशस्वी होऊ देणार नसल्याचा निर्धार माळी यांनी प्रास्ताविकातून व्यक्त केला. आज या बहुजन मोर्चात निळ्या सोबत भगवे दिसत आहे त्यामुळे बाबासाहेबाना अपेक्षित समाज आज येथे जमा झालेला दिसत असल्याचे प्रतिपादन नितीन मोरे यांनी केले. जितेंद्र एन.जैन यांनी हा मोर्चा बहुजन समाजतील प्रत्येक समुदायाच्या अस्तितवाचा ऐतिहासिक लढा असून एकमेकांना आधार देण्यासाठी हा समाज एकवटला असल्याचे सांगत सुशिक्षति पदवीधर तरुणांनी आपल्या न्याय हक्कासाठी मंथन करावे आणि सरकारने केवळ महामंडळे आणि मंत्रालय न काढता त्यांना निधी देण्याची मागणी जितेंद्र एन.जैन यांनी केली. हाफिज रहेमत खान कुरेशी यांनी संविधानाने सर्वाना एकत्र ठेवण्याचे काम केले असल्याचे नमूद केले. दामोधर बिडवे यांनी बारा बलुतेदार समाजाच्या समस्या मांडत अट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी अवास्तव असल्याचे सांगत कायद्यात बदल करणे तर सोडा कायदा ढिल्लाही होवू शकत नसल्याचे सांगितले. तसेच बारा बलुतेदारांसाठी स्वतंत्र महामंडळाची मागणी केली. सतीश शिंदे यांनी मुंबई येथे झालेल्या बलुतेदार समाजातील मुलीच्या बलात्कार आणि खून प्रकरणी सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप केला. याप्रसंगी कामगार नेते अशोक दाभाडे, प्रा. डी आर माळी भटक्या विमुक्त समाजाचे नेते समाधान गुजहाळकर, दिलीप जाधव, अोंरे, आदींचीही समायोचित भाषणे झाली. शाहीर वा.का. दाभाडे यांनी गीत सादर केले.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षन व वक्ते वामन मेश्राम यांनी सभेला संबोधीत करतांना मराठा मुक मोर्चावर आक्षेप घेत सांगितले की, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या 108 वर्षाच्या लढ्यानंतर आपल्या सर्वांना बोलण्याचा, आपल्या मागण्या मागण्याचा मुलभूत हक्क मिळाला आहे. त्यानुसारच आपण मोर्चे काढायला पाहिजेत. मराठा समाजाने काढलेला मुक मोर्चा हा संविधान विरोधी आहे. जर तुम्ही तुमच्या मोर्चाला क्रांती मोर्चा नांव देत आहात आणि तो मुक स्वरुपात काढत आहात तर हा संविधानाचा अपमान आहे. बहूजन क्रांती मोर्चा काढण्याची गरज का पडली? हे या ठिकाणी सांगणे गरजेचे आहे. मराठा क्रांती मार्चेदरम्यान झालेल्या अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी ही गंभीर स्वरुपाची मागणी होती. यामध्ये संघाची खेळी असल्याचेही त्यांनी सागितले. त्यावेळी संघाचे काही नेते आमच्याकडे येवून मराठा समाज अॅट्रॉसिटी विरोधात मोर्चे काढत असून तुम्ही सुध्दा त्याच्याविरोधात प्रतिमोर्च काढा तुम्हास हवी असणारी कोणत्याही प्रकारची मदत आम्ही करू असे सांगितले. मात्र यामध्ये मराठा आणि बौध्द समाज आपसात लढविण्याचे षडयंत्र त्यांचे असल्याचे आम्ही ओळखले व तत्काळ प्रतिमोर्चे न काढता या ठिकाणी सर्व बहूजन समाज आणि अठरा पगड जाती धर्माना सोबत घेवून मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. डॉ.प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले या समाजाच्या नेत्यांनी राजकीय स्वार्थापोटी प्रतिमोर्चे काढण्यात मनाई केली मात्र जो नेता गरजेच्या वेळी समाजासोबत उभा राहत नाही अशा नेत्यांचे फतवे समाजाने धुडकावून लावत मोर्चा काढण्यास सुरुवात केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्यामध्ये फडणवीस सरकार आणि केंद्रामध्ये मोदी सरकार यांच्यावरही त्यांनी कडाडून टिका केली. गृहमंत्रालयातर्फे सादर करण्यात आलेल्या अत्याचारा संबंधीच्या आकडेवारीत भारतातील 36 राज्यांपैकी प्रथम 5 राज्यात महाराष्ट्र राज्याचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काय परिस्थीती असेल हे लक्षात येते. सरकार फक्त कमिटी स्थापन करते मात्र त्यातुन निष्पणा काहीही होत नाही कमिटीत फक्त हिजड्यांची औलादत बसवून ठेवली असते. मोदी जेथे जातील तेथे गंगा मेरी मॉ है, जमुना मेरी मॉ है, भारत मेरी मॉ है, भाजपा मेरी मॉ है असे सांगत फिरत असतात. मात्र त्यांनी कधितरी आपला बाप कोण असल्याचा उल्लेख करावा असा टोला लगावला.
कार्यक्रमाच्या शेवटी पत्रकार दीपक मोरे आणि अमोल खरे यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले. सभेचे सूत्रसंचालन कुणाल पैठणकर यांनी तर आभार वैशालीताई ठाकरे यांनी मानले. यावेळी सतीश पवार, अॅड. गणेश इंगळे, अर्जुन गवई, बाबासाहेब जाधव, लक्ष्मण घुमरे, आदी मान्यवरांनीही मंचकावर उपस्थिती होती. या मोर्च्यांसाठी जिल्हाारातुन हजरोच्या संख्येने बहुजन समाज एकवटला होता.
Post Comment