Breaking News

शेतकर्‍यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे ः अविनाश घुले

। जिल्हा हमाल पंचायतीच्यावतीने काळ्या फिती लावुन घंटानाद आंदोलन 

अहमदनगर, दि. 30 - शेतकर्‍यांचे 60 वर्ष झाल्यानंतर माथडी कामगारांसह सर्व कष्टकर्यांकरीता 10 हजार रु. पेन्शन मिळाली पाहिजे. तसेच स्वामीनाथ  समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करुन शेतमालाला उत्पादन खर्च वजा जाता 50 टक्के नफा ग्रहित धरुन हमी भाव दिलाच पाहिजे. तसेच माथडी मंडळास  पुर्ण स्टॅाक देवुन माथडी कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे. माथडी मंडळावर व्यापारी अस्थापना, शेतकरी, माथडी, कामगार संघटनेचे प्रतिनिधी आदींच्या  नेमणुका तात्काळ करण्यात यावा, या व इतर मागण्यांसाठी अहमदनगर जिल्हा हमाल पंचायतीच्यावतीने बाजार समिती आवारात काळ्या फिती लावून घंटानाद  आंदोलन करण्यात आले. यावेळी अविनाश घुले बोलत होते. 
महाराष्ट्र राज्य हमाल/मापाडी महामंडळ व अहमदनगर जिल्हा हमला पंचायत यांच्या वतीने या आंदोलनात उपाध्यक्ष गोंविद सांगळे, शेख रज्जाक शेख लाल,  कॉ.बाबा आरगडे, मधुकर केकान, बाळासाहेब वडागळे, बबन आजबे, बहिरु कोतकर,सतिष शेळके, रावसाहेब दराडे, किसन सानप, रविंद्र भोसले, शेख  म्हमुलाल, अनुराध कदम, अशोक जायभाय, पांडूरंग चक्रनारायण, केरु वाबळे, लक्ष्मण वायभासे, दत्तात्रय भोजने, नवनाथ बडे, प्रल्हाद बोठे आदींसह सर्व  पदाधिकारी कार्यकर्ते हमाल माथडी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना घुले म्हणाले कि, शेतकर्याला मालाच्या हमी भावाने पैसे तात्काळ दिले पाहिजे. यासाठी बाजार समितीत हमी फंडाची, तरतुद केले पाहिजे. या  हमी फंडाला राज्य, केंद्र सरकारकडून विशेष आर्थिक मदत मिळाली पाहिजे. शेत मालाच्या पणण किंवा विक्री प्रक्रियेत काही बदल होणे अपेक्षित आहेत. असेही  त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. शेतकर्यांच्या सातबारा कोरा झाला पाहिजे. आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्यावतीने राज्यभर आज  घंटानाद आंदोलन व काळ्या फिती लावुन निषेध करण्यात आला.
यावेळी हमाल पंचायतीपासून सुरु झालेल्या या निषेध मोर्चात सर्व हमाल माथडी घोषणा देऊन सहभागी झाले. संपुर्ण मार्केट परिसरात फिरल्यानंतर सांगता सभा  घेण्यात आली. यावेळी कॉ.बाबा आरगडे, मधुकर केकान, गोंविद सांगळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.