मुंबईतील मराठा मोर्चासाठी औरंगाबादेत बाईक रॅली
औरंगाबाद, दि. 01, ऑगस्ट - मुंबईत 9 ऑगस्टला होणार्या मराठा क्रांती मोर्चासाठी सध्या राज्यात विविध ठिकाणी बाईक रॅली आयोजित केल्या जात आहे. औरंगाबादमध्ये आज अशीच एक रॅली आयोजित करण्यात आली होती. अनेक तरुण आपल्या बाईकसोबत रस्त्यावर उतरले. मुंबईतल्या मराठा क्रांती मोर्चाला जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन, या बाईक रॅलीद्वारे करण्यात येत आहे.
या रॅलीमध्ये महिला- तरुणांची लक्षणीय गर्दी होती. औरंगाबादच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयापासून या रॅलीला सुरुवात झाली. गजानन महाराज मंदिर, सेव्हन हिल, क्रांती चौक , पैठणगेट मार्गे छत्रीपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप झाला. दरम्यान, कोपर्डी बलात्काराच्या घटनेनंतर राज्यभरात मोठ्या प्रमाणात मराठा मोर्चे निघाले होते. या मोर्चांमध्ये ना घोषणाबाजी ना कोणाचं नेतृत्त्व होतं. शिस्तबद्धपणे मूक मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर आता राजधानी मुंबईत येत्या 9 ऑगस्टला क्रांती दिनाचं औचित्य साधून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा हा मोर्चा निघणार आहे.