चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजलेच पाहिजे : अमिताभ बच्चन
नवी दिल्ली, दि. 17 - भारतीय चित्रपटातगृहात राष्ट्रगीत वाजलेच पाहिजे, अशी मागणी पुन्हा जोर धरत असून आता या मागणीला महानायक अमिताभ बच्चन यांनीही समर्थन दिले आहे. अमिताभ बच्चन यांचा ‘पिंक’ हा चित्रपट शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अमिताभ आणि चित्रपट निर्मते शूजित सरकार दिल्लीत आले होते. यावेळी त्यांनी भावना व्यक्त केली. बॉलिवूडमध्ये ‘लव डे’ या चित्रपटातून पदार्पण करणारा अभिनेता हर्ष नायरने एक पत्रक काढून चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजले पाहिजे, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. यानंतर महानायक अमिताभ बच्चन यांनीही या मागणीला समर्थन दिले.