वीरेंद्र तावडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
गेल्या 14 दिवसांमध्ये तावडेने तपासाबाबत काहीच सहकार्य केले नाही त्याने वेळेचा अपव्यय केला असे पोलिसाकडून न्यायालयात सांगण्यात आले. दरम्यान, तावडेला सीबीआयची कोठडी असल्यामुळे त्याला कोल्हापूरच्या जेलमध्ये न ठेवता पुण्याच्या येरवडा कारागृहात हलवण्यात येणार आहे. त्यामुळे एकीकडे तपास गतीमान होत आहे असे चित्र असतानाच आता तावडेची पोलीस कोठडी संपल्यामुळे एसआयटीचा तपास कशा पद्धतीने होणार याकडे आता सगळ्याचे लक्ष आहे.