परिस्थितीशी जुळवून घेणे यशाचे सूत्र : पी. व्ही. सिंधू

नवी दिल्ली : 01 - वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील दोन कांस्यपदकांच्या यादीत ऑलिम्पिक पदकाचा समावेश करण्यास सज्ज असलेल्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने रियोमधील परिस्थितीशी जुळवून घेणे आणि त्यानुसार कोर्टवरील रणनीतीत बदल करणे यशाचे सूत्र असल्याचे म्हटले आहे.
वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 2013 आणि 2015 असे सलग दोन वेळा कांस्यपदक जिंकणारी सिंधू म्हणाली, की रियोमध्ये कशी परिस्थिती असेल याची आम्हाला कल्पना नाही, म्हणून आम्ही तेथे लवकर जात आहोत. तेथे आम्ही एक आठवडा सराव करुन कोर्टची सवय करुन घेणार आ
होत.