पेट्रोल 1.42 तर डिझेल 2.1 रुपयाने स्वस्त

नवी दिल्ली, दि. 01 : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या किमतीत घट झाल्याने तेल विपणन कंपन्यांनी आज पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 1 रुपया 42 पैसे आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 2 रुपये 10 पैशांनी कपात जाहीर केली आहे. हे नवे दर आज मध्यरात्रीनंतर लागू होतील.तेल कंपन्या 15 दिवसातून एकदा पेट्रोल व डिझेलच्या किमतीची समीक्षा करतात, ज्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खनिज तेलाचे दर आणि घरगुती पातळीवरील चलन विनिमय दर विचारात घेण्यात येत असतो. याच आधारावर इंधनदरात कपात व वाढ याबाबत निर्णय घेण्यात येतो.