Breaking News

कुमारस्वामींच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी

राज्य सरकारने आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी अर्थसंकल्प सादर करत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. शेतकऱ्यांचं सरसकट दोन लाखांचं कर्ज माफ करण्यात आलंय.  यामध्ये 34 हजार कोटी रुपयांची शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलीय. निवडणुकीच्या वेळी काँग्रेस आणि जेडीएसनं जाहीरनाम्यात ज्या आश्वासनांचा उल्लेख केला होती त्यांची पूर्तंता या बजेटमध्ये केल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय. पण दुसरीकडे कुमारस्वामींनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केलीये.