कतरिना कैफच्या बिझी शेड्यूलचा फायदा श्रद्धा कपूरला


कतरिना कैफच्या बिझी शेड्यूलचा फायदा श्रद्धा कपूरला मिळताना दिसत आहे. कतरिनाकडे तारखा नसल्याने बत्ती गुल मीटर चालू हा आगामी चित्रपट श्रद्धाच्या पदरी पडण्याची दाट शक्यता आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक नारायण सिंग यांची शाहीदच्या अपोझिट कतरिनाला आणण्याची इच्छा होती, परंतु हे शक्य झाले नाही. 

त्यानंतर त्यांनी शाहीद व श्रद्धाची जोडी बनवण्याचा विचार सुरू केला. शाहीद व श्रद्धा हैदर या चित्रपटामध्ये एकत्र दिसून आले होते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, या नव्या चित्रपटासाठी श्रद्धाशी बोलणी सुरू असून, तिने अद्याप होकार दिलेला नाही. 

नारायण सिंग यांनी यापूर्वी अक्षय कुमार व भूमी पेडणेकर स्टारर चित्रपट टॉयलेट : एक प्रेमकथा बनविला आहे. बत्ती गुल मीटर चालू पुढील वर्षी ३१ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट एका सामान्य माणसाची वीज कंपन्यांबरोबरची लढाई यावर आधारित आहे.

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा