Breaking News

पकडलेला डंपर सोडा अन्यथा सातारा तहसील कार्यालयासमोर आत्मदहन

सातारा/प्रतिनिधी । बेकायदा वाळू वाहतूकप्रकरणी पकडलेला डंपर सोडा अन्यथा कार्यालयाच्या दारात आत्मदहन करेन, अशी धमकी एका वाळूमाफियाने सातारा तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांना दिल्याने खळबळ उडाली. अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी संबंधितांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा विचार महसूल विभाग करत आहे.

सातारा तालुका पोलिसांनी खिंडवाडी येथे रात्रीच्यावेळी बेकायदा वाळू वाहतूक करणारा डंपर पकडला. संबंधित वाळूठेकेदार खटाव तालुक्यातील असल्याचे त्यावेळी समोर आले. पोलिसांनी पुढील कारवाईसाठी जप्त केलेला डंपर सातारा तहसीलदार कार्यालयाच्या ताब्यात दिला. संबधित डंपरला 2 लाख 68 हजाराचा दंड करण्यात आला. बेकायदा वाळूवाहतूक तसेच त्यासाठी वापरलेले वाहन या दोन्हीही बाबी लक्षात घेवून नव्या नियमानुसार सातारा तहसीलदारांनी संबंधित वाहनावर दंडात्मक कारवाई केली. दंडाची रक्कम क मी करण्यासाठी प्रयत्न करुनही काहीच झाले नाही. त्यामुळे चिडलेल्या वाळू ठेकेदाराने जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्‍याचा संदर्भ दिला. मात्र, तरीही उपयोग होत नसल्याने चिडलेल्या वाळू ठेकेदाराने सातारा तहसीलदारांना दम दिला. वाहन सोडले नाही तर तुमच्या कार्यालयाच्या दारात आत्मदहन करेन, असा इशाराच त्याने दिला. संतपापलेल्या तहसीलदारांनी संबंधित वाळू ठेकेदाराला कार्यालयाबाहेर काढले.