Breaking News

इजिप्तमध्ये बसवर दहशतवाद्यांचा गोळीबार, 26 ठार

कैरा, दि. 28 - मध्य इजिप्तमध्ये आठ ते दहा बंदुकधा-यांनी बसवर केलेल्या गोळीबारात 26 जणांचा मृत्यू झालाय तर 25 जण गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी हे हत्याकांड घडलंय. कॉप्टिक ईसाइला घेऊन जाणा-या एका बसवर हा हल्ला करण्यात आला. मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश अधिक आहे.
ख्रिस्ती समाजावर झालेला हा या महिन्यातील दुसरा मोठा हल्ला आहे. काहिरावरुन 250 किमी दक्षिण भागात अंबा शमुवेल मोनेस्ट्रिकडे जात असताना या बसवर  बंदुकधा-यांनी अंदाधूंद गोळीबार केला. अद्याप कोणीही या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीवरून हल्लेखोर हे लष्कराच्या वेशात  होते अशी माहिती मिळाली आहे.