Breaking News

कर्करोगाचा पेशींच्या फैलाव करणाऱ्या प्रोटीनचा शोध.


टोरंटो : शरीरात अनियंत्रितपणे वाढणाऱ्या कर्करोगाच्या पेशींचा प्रभाव ओळखणाऱ्या प्रोटीनचा शोध लावल्याचा शास्त्रज्ञांनी केला आहे. या प्रोटीनमुळे कर्करोगाच्या गाठी वेगाने वाढण्यास मदत होते. शास्त्रज्ञांनी शोध लावलेल्या या प्रोटीनचे 'कॅडरिन-२२' असे नाव असून त्याच्यामुळे कर्करोगाचा प्रभाव जलद गतीने ओळखता येणे शक्य आहे, असे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले. 

'कॅडरिन-२२' हे प्रोटीन कर्करोगाचे तातडीने निदान करण्यासाठी सर्वात प्रभावशाली प्रथिन ठरणार आहे. कॅनडातील ग्युलेफ विद्यापीठातील जीन युनिके यांच्या नेतृत्त्वाखालील चमूने हे संशोधन केले असून ते 'ऑन्कोजिन' या नियतकालित प्रसिद्ध झाले आहे. शरीरात कमी ऑक्सिजन असलेल्या परिस्थितीत कर्करोगाच्या पेशी वाढतात आणि त्याच वेळी 'कॅडरिन-२२' प्रोटीन या पेशींवर नियंत्रण ठेवते. 

वेगाने इतरत्र वाढणाऱ्या कर्करोगाच्या पेशींना हे प्रोटीन रोखण्याचे काम करते, असेही शास्त्रज्ञांनी सांगितले. स्तन आणि मेंदूच्या कर्करोगावर संशोधन केले जात असताना 'कॅडरिन-२२' प्रोटीनचा शोध लागला. हे प्रोटीन कर्करोगाच्या पेशींना रोखत असल्याचे त्याचवेळी दिसून आले. कर्करोग पेशींच्या विस्तारात कॅडरिन-२२चा समावेश असल्याचे अध्ययनात दिसून आले. ज्या ट्यूमरमध्ये जेवढा कमी ऑक्सिजन होतो, तिथे कॅडरिन-२२चे अस्तित्व जास्त होते. त्यामुळे कर्करोग आणखी भयावह होत जातो.

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा