Breaking News

ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या मिनाक्षी शिंदे निश्‍चित : सूत्र

ठाणे, दि. 02 - ठाण्याच्या महापौरपदासाठी शिवसेनेच्या मिनाक्षी शिंदे तर उपमहापौरपदासाठी रमाकांत मढावी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मीनाक्षी शिंदे यांनी यापूर्वी आरोग्य समितीचं सभापतीपदही भूषवलं आहे. मिनाक्षी शिंदे यांना कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी त्यांना नाही. तसंच घराणेशाहीला फाटा मिळावा यासाठी मीनाक्षी शिंदे यांची महापौरपदासाठी निवड करण्यात आली आहे. 131 जागांच्या ठाणे महापालिकेत 67 जागांसह शिवसेनेला पूर्ण बहुमत आहे. तर भाजप 23, राष्ट्रवादी 34, काँग्रेस 3, एमआयएम 2 आणि अपक्ष/ इतरांना 2 जागा मिळाल्या आहेत.