डोकलाम सेक्टरमध्ये चिनी लष्कराने पुन्हा एकदा कुरापती सुरू केल्या
गुप्तहेर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, डोकलामच्या वादग्रस्त भागात चीनने मोठा फौजफाटा गोळा केला आहे. या ठिकाणी चिनी सैनिकांनी आपला राष्ट्रध्वज उभा करत एक उंच भिंत बांधली आहे. सोबतच सैनिकांसाठी १६ बंकर, ६ बोगदे व तब्बल २७ शेडही उभे करण्यात आलेत. अत्याधुनिक टेहळणी रडारसह २०० ते २५० टेंटही या ठिकाणी लावण्यात आलेत.
विशेष म्हणजे आणीबाणीच्या स्थितीत अडचण येऊ नये म्हणून भूतानच्या सीमेलगत राहणाऱ्या नागरिकांनाही चिनी सैनिकांकडून पिटाळून लावण्यात येत आहे. त्यामुळे भारताच्या काळजीत भर पडली आहे. या भागात भविष्यात भारतासोबत वाद उद्भवलाच तर आपली स्थिती मजबूत रहावी या उद्देशाने चीनकडून ही पावले उचलण्यात येत आहेत.
Post Comment