भाजपाच्या राजवटीत लोकशाही धोक्यात - ममता बॅनर्जी
कोलकाता : केंद्रातील सत्तारूढ भाजपच्या राजवटीत लोकशाही धोक्यात आल्याचा गंभीर आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी केला आहे. व्यापक जनहित लक्षात घेता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तमाम विरोधी पक्षांनी एकजूट दाखवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
बंगालमधील अनेक विकास प्रकल्पांत एनडीए सरकार जाणीवपूर्वक खोडा घालत असल्याची टीका त्यांनी केली. कोलकाता येथे आयोजित इंडिया टुडे कॉन्क्लेव ईस्ट परिसंवादात ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर जोरदार आगपाखड केली आहे. केंद्रातील भाजपशासित सरकारच्या काळात देशात आणीबाणीसारखी परिस्थिती आहे
