Breaking News

भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेत गोळी झाडून हत्या

हैदराबाद - अमेरिकेच्या मिसौरी राज्यातील कॅन्सस शहरात एका भारतीय विद्यार्थ्याचा अज्ञाताने गोळी झाडून खून केल्याची घटना घडली आहे. येथील एका रेस्टॉरंटमध्ये ही घटना घडली. शरथ कोप्पुला असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मिसैरी विद्यापीठात शिकत होता. अज्ञाताने केलेल्या गोळीबारात कोप्पूला गंभीर जखमी झाला होता. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेच त्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली, कोप्पुलाच्या मित्रांनी त्याच्या घरच्यांना फोनवरून घटनेची माहिती दिली. मारेकर्‍याची ओळख आणि हत्येमागचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. शरथ हा वारंगळचा रहिवासी आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने हैदराबादमध्ये नोकरी केली. तो याच वर्षी एमएस करण्यासाठी अमेरिकेत गेला होता.