दखल - भाजपचा आणखी एक पराभव


देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यापासून भाजपला सातत्यानं विजय मिळत होता. एका मागून एक राज्य पादाक्रांत करीत भाजपची वाटचाल सुरू होती. अगदी गेल्या चार महिन्यांपूर्वीपर्यंत भाजपच्या विजयाचा वारू कुणीच रोखू शकत नाही, अशी अवस्था होती. पंजाबचाच काय तो अपवाद. इतर सर्व निवडणुकीत भाजपनं सर्वांवर मात केली होती. काँग्रेसमुक्त भारत करण्याचं भाजपचं स्वप्न होतं. आता या वक्तव्याचा थेट अर्थ काढू नका, असं सांगण्यापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका बदलली आहे. काँग्रेसमुक्त भारत करण्याऐवजी आता भाजपची काँग्रेसयुक्त भाजप अशी वाटचाल होते आहे, की काय असा प्रश्‍न पडावा, अशी स्थिती आहे. 

काँग्रेसच्या बदनाम, भ्रष्ट नेत्यांना प्रवेश देण्यामुळं भाजप इतक्या वाल्यांना वाल्मिकी कसं करणार, असं गमतीनं विचारलं जात आहे. एकीकडं ही स्थिती असताना दुसरीकडं भाजप विरोधात देशभर वातावरण हळूहळू का होईना तयार व्हायला लागलं आहे. नोटाबंदी, जीएसटी, महागाई, बेरोजगारी अशी कितीतरी कारणं त्यामागं आहेत. भाजपचं वस्त्रहरण क रण्यात त्यांचेच नेते गुंतले आहेत. 

ज्या काँगे्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करून सत्ता मिळविली, तेच आरोप आता भाजपवर व्हायला लागले आहेत. जय शहा, डोवाल आणि आता गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपांनी यांच्यावरच्या आरोपामुळं भाजपला बॅकफूटवर जावं लागलं आहे. देशातल्या कोणत्याही राज्याच्या प्रगतीशी तुलना न करता थेट चीन, अमेरिकेशी तुलना करणार्‍या मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनाही जनतेनं असंच ताळ्यावर आणलं आहे. 

शेतकरी आंदोलनाला लागलेलं हिसंक वळण, त्यात गेलेला शेतक र्‍यांचा बळी, व्यापम घोटाळ्यातील आरोपींचा संशयास्पद मृत्यू, त्याच्या तपासाबाबतची सांशकता या पार्श्‍वभूमीवर मध्य प्रदेशातही सरकारविषयी नाराजी आहे. ही नाराजी चित्रकूट विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून बाहेर तर पडली नाही ना, अशी शंका यायला लागली आहे.

 
काँगˆेसचे आमदार पˆेमसिंह यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक झाली. 29 मे रोजी वयाच्या 65 व्या वर्षी त्यांचं निधन झालं होते. तिथं नऊ नोव्हेंबर रोजी मतदान झालं होतं. पुरुंषांपेक्षा महिलांनी सर्वाधिक मतदान केलं होतं. ही जागा जरी काँग्रेसची होती, तरी भाजप आणि काँगˆेसनं ती जिंकण्यासाठी आपली संपूर्ण ताकद या निवडणुकीसाठी वापरली होती. 

निवडणुकीच्या रिंगणात 12 उमेदवार होते. स्वतः मुख्यमंत्री चौहान यांनी तीन दिवस चित्रकूटमध्ये थांबून होते. त्यांनी एकट्यानं या मतदारसंघात 62 सभा घेतल्या. याचा अर्थ या विधानसभा मतदार संघातल्या बहुतांश भागात त्यांनी पˆचार केला होता. त्यांच्या मंत्रिमंडळातील अन्य डझनभर मंत्र्यांनीही चित्रकूट हा मतदारसंघ पिंजून काढला. खरं तर एका जागेची ही पोटनिवडणूक भाजपनं फार प्रतिष्ठेची करायचं काहीच कारण नव्हतं. चित्रकूटमध्येच नानाजी देशमुख यांनी आपली आख्खी हयात घालविली. 

त्यांनी संघाच्या माध्यमातून केलेलं काम देशाचं प्रारुप मॉडेल म्हणून पुढं आलं. नानाजींचं तिथं प्रदीर्घकाळ वास्तव्य होतं. असं असलं, तरी चित्रकूटसारख्या क ाही भागात काँग्रेसचं अस्तित्त्व टिकूनं होतं. त्यामुळं या मतदारसंघाला भाजपनं फार प्रतिष्ठेचं करण्याचं काहीच कारण नव्हतं; परंतु पुढच्या वर्षी मध्य प्रदेशातही विधान सभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळं आताची निवडणूक ही राज्य सरकारच्या गेल्या दीड दशकांहून अधिक काळाच्या कामगिरीचं मूल्यमापन करणारी ठरेल, असं उगीचच भाजपनं वाटून घेतलं. चित्रकूट हा मतदारसंघ उत्तर प्रदेशाला लागून आहे. त्यामुळं उत्तर पˆदेशचे उपमुख्यमंत्री केशवपˆसाद मौर्य यांनीही तिथं पˆचारासाठी आणण्यात आलं होतं.
या पोटनिवडणुकीत काँगˆेसचे उमेदवार नीलांशू चतुर्वेद यांनी भाजपचे उमेदवार शंकरदयाल त्रिपाठी यांचा 14 हजार 333 मतांनी पराभव केला. पहिल्या फेरीत त्रिपाठी हे आघाडीवर होते. नंतर मात्र चतुर्वेर्दी यांनी अखेरपर्यंत आघाडी घेऊन बाजी मारली. काँग्रेसनंही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. ती जिंकल्यानं काँग्रेसचा आत्मविश्‍वास दुणावला आहे. दिल्ली विद्यापीठ, जेएनयू, अलाहाबाद विद्यापीठ, काशी विद्यापीठ, हैदराबाद विद्यापीठ अशा युवकांच्या निवडणुकीत भाजपला सातत्यानं हार पत्करावी लागली. 

गुरुदासपूर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा एक लाख 93 हजार मतांनी पराभव होतो. नांदेडच्या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावूनही भाजपला हाताच्या बोटावर मोजता येतील, एवढ्याच जागा मिळतात. हे सारं पाहिलं, तर भाजपला पराभवाचे एकामागून एक धक्के का बसत आहेत, याचं आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे, एवढं नक्की. पोटनिवडणुकांचे निकाल म्हणजे संपूर्ण देशाचं चित्र नव्हे, हे खरं असलं, तरी एकामागून एक होणार्‍या पराभवांकडं दुर्लक्ष करणं हे ही चांगलं नाही. 

जीएसटीच्या दरात कपात क रण्यात आली. व्यापार्‍यांचा दंड कमी करण्यात आला. हे शहाणपण सरकारला गुजरातच्या निवडणूकीअगोदर सुचलं, ते फार आधी सुचलं असतं, तर कदाचित ही वेळ आली नसती. उत्तर प्रदेशात नगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत. आता ज्या भागातले निकाल आले, ते उत्तर प्रदेश आणि त्याला लागून असलेल्या भागातील आहेत. त्याचा उत्तर प्रदेशच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एकीकडे देशात स्टार प्रचार म्हणून जात असताना आणि उत्तर प्रदेशात भगवीकरणं सुरू केलं असताना त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय, रस्त्यांचे फलक भगवे करण्यात समाधान मानलं आणि अंतर्गत खदखद जाणून उपाययोजना केल्या नाही, तर लोक त्यांना तिथंच मगक् ठेवून पर्याय शोधतील. त्याची जाणीव त्यांनी ठेवायला हवी. उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था, बालमृत्यू आदी मूलभूत समस्या भगवेकरणापेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत, हे त्यांनी लक्षात घेतलं, तर लोक त्यांना अजूनही स्वीकारतील.