Breaking News

कार्यकारी अभियंता बाईं समोर आमदार हतबल.

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - आमदारांसारख्या घटनात्मक दृष्ट्या अतीमहत्वाच्या पदावर असलेल्या शासीत मंडळींना अंधारात ठेवून पाच कोटीचा गैरव्यवहार पचविण्यात यशस्वी झालेल्या कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके या साबांच नव्हे तर एकूण प्रशासनात चर्चेचा विषय बनल्या आहेत. विद्यमान सरकारची कार्यपध्दती लक्षात घेता एव्हढ्या मोठ्या प्रमाणात झालेला घोळ, तोही आमदार निवास सारख्या सतत जागरूकतेचा पहारा ठेवणार्या मंडळींशी संबंधित प्रकरणात गैरव्यवहार करून आपली पदस्थापना कायम ठेवणे शक्य करून दाखविलेल्या प्रज्ञा वाळके यांना साबांतून विशेष उपाधीने सन्मानित केले जाऊ लागले आहे.दरम्यान मंञी पातळीवरून भक्कम पाठींबा मिळाल्याशिवाय या सारखे मोठे यश मिळवता येत नाही ही चर्चाही साबां मंञ्यांच्या खुर्चीखाली धुर निर्माण करीत आहे.


मुंबई सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या शहर इलाखा विभागाच्या चर्चीत कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांनी आपल्या कार्यकाळात मनोरा आमदार निवासातील काही क क्षांमध्ये काम केल्याचे केवळ कागदावर दाखविले आणि त्यामाध्यमांतून पाच कोटींचा अपहार केला. असा आरोप आ. चरणभाऊ वाघमारे यांनी केल्यानंतर दस्तात फेरफार करून खाडाखोड करण्याचा प्रमाद करण्यात आला.
या अपहाराची चर्चा होऊ लागल्यानंतर साबां मंञी चंद्रकांत दादा पाटील यांनी या अपहाराला अनियमितताचे प्लस्टर चोपडून या गंभीर प्रकरणाची चेष्टा केली.संशयीत कार्यकारी अ भियंता प्रज्ञा वाळके यांना या अपहार प्रकरणातून सहीसलामत बाहेर ठेवण्यासाठी साबां मंञ्यांनी अनियमिततेची ढाल पुढे केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

शहर इलाखा विभागात कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके या अंतिम निर्णयाधिकारी होत्या.प्रत्येक निर्णय त्यांच्या संमती शिवाय अशक्य असतांना आमदारांशी संबंधित या गंभीर प्रकरणात कारवाईच्या कक्षेबाहेर त्या कशा राहू शकतात? मंञ्यांच्या म्हणण्याप्रमाणे ही अनियमितता असेल तर तिची मर्यादा कार्यकारी अभियंत्यापर्यंत सिमीत आहे का? निलंबीत केलेल्या त्या दोन सहअभियंत्यांना मंञ्यांच्या कथित अनियमिततेचा फायदा का दिला गेला नाही? या सारखे प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.
या प्रकरणाची साबां पातळीवर चौकशी झाली आहे.अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांनी आपल्या चौकशी अहवालात कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके,सहअभियंता धोंडगे,फेगडे यांना समप्रमाणात दोषी धरून गैरव्यवहार केल्याच्या आरोपावर शिक्कामोर्तब केले आहे.
काम न करता देयके अदा झालेले कक्ष अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांचा चौकशी अहवालया एकूण दस्तांवरून आ.चरणभाऊ वाघमारे यांनी केलेल्या आरोपांमध्ये शतप्रतीशत तथ्य असतांनाही साबां मंञी चंद्रक्रांत दादा पाटील यांनी भ्रष्ट कार्यकारी अभियंत्यांना संरक्षण दिल्याचे स्पष्ट होते.वास्तविक हा गंभीर प्रकार असतांना हेतूपुरस्सर दुर्लक्षित केला जात असल्याचा आरोप केला जात आहे.

आ.चरणभाऊ वाघमारे या प्रकरणात संगनमत,संघटीत क टकारस्थान,शासनाची आमदारांची दिशाभूल फसवणूक झाल्याचे निदर्शनास आणून देत संबंधित दंड विधान कलमान्वये फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.साबां मंञ्यांच्या शुक्राचारी भुमिकेमुळे साबां प्रशासन कारवाई करण्यात टाळाटाळ करीत आहे तर दुसर्या बाजूला संशयित कार्यकारी अभियंता आमदारांचा बुध्दीभेद करून स्वतःची बाजू सावरण्याचा प्रयत्न करीत असल्याचीही चर्चा आहे.

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात या मुद्यावर आमदारांकडून औचित्य भंगाचा मुद्दा उपस्थित
झाला तर शहर इलाखा विभागातील कार्यकारी अभियंत्यांचे हे अपहार प्रकरण इंट्रेस्टींग मोडवर गाजू शकते.तेंव्हा साबां मंञी अभियंता बाईंना वाचवितांना यशस्वीपणे बटींग करतात क ी विकेट टाकतात हे पहाणे औत्सूक्याचे ठरणार आहे.