चंद्रकांतदादांच्या भलत्याच ऑफर !
राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील व वाद हे समीकरण काही थांबायला तयार नाही. दादा एकामागून एक वाद अंगावर ओढवून घेत आहेत. माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची जागा घ्यायची दादांना भलतीच घाई झालेली दिसते! राज्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर दुसर्या क्रमांकाचं स्थान दादांनाच असलं, तरी दादा कधी कधी मुख्यमंत्र्यांच्या अधिकारावरही अतिक्रमण करतात. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सासुरवाडीचे दादा असल्यामुळं त्यांना काहीही करायला मोकळीक आहे, असं त्यांना वाटत असावं. त्यामुळं कोणत्याही घोषणा करून ते मोकळे होतात. पक्षात प्रवेश कुणाला द्यायचा, कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचं, याबाबतही ते सातत्यानं भाष्य करीत असतात.
कुणाला कोणतं खातं द्यायचं, हा खरं तर मुख्यमंत्र्यांचा अधिकार; परंतु दादा स्वत: कडील खातं नारायण राणे यांना देऊन कधीच मोकळे झाले! अर्थात आता त्यांनी त्यांच्याकडचं खातं द्यायला नकार दिला हा भाग वेगळा. दादा खरं तर मासबेस नेते नाहीत; परंतु एखादं पद मिळालं, की अंगात जोश येतो. त्यातून काहीही बोलायची
परवानगी मिळाली, हा गैरसमज होतो. गेल्या आठवड्यात त्यांनी अधिकार्यांना खड्डे बुजविण्यासाठी अर्धेच सिंमेट वापरा आणि त्यातून राहिलेल्या पैशात चांगल्या बातम्या छापण्यासाठी पत्रकारांना मॅनेज करा, असा सल्ला त्यांनी अधिकार्यांना दिला. आता दादा तेवढ्यावर थांबले नाहीत. भाजप पˆवेशासाठी दादांनी पाच कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला. हर्षवर्धन जाधव हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष, खासदार रावसाहेब दानवे यांंचे जावई असल्यानं भाजपतून तर दादांच्या महत्त्वकांक्षांना आवर घालण्यासाठी ही खेळी खेळली जात नाही ना, अशी शंका यायला लागली आहे.
हर्षवर्धन जाधव यांच्या आरोपामुळं राज्यात खळबळ उडाली नसती, तरच नवल. शिवसेनेतील 25 आमदारांनाही आम्ही पैसे देऊन फोडणार आहोत, तुम्ही राजीनामा देऊन भाजपात या, पोटनिवडणूक लढवा, निवडून आणण्याची आमची जबाबदारी, विजयी झाला तर आनंदच नाही, तर तुम्हाला विधान परिषदेवर घेऊ, असं आश्वासन दिल्याचा दावा जाधव यांनी केला आहे. हर्षवर्धन जाधवांची ही नौटंकी असून, शिवसेनेचे आमदार फोडण्याचा पˆश्नच नसल्याचं भाजपचे मुख्य पˆवक्ते माधव भंडारी यांनी म्हटलं असलं, तरी त्यावर कुणी विश्वास ठेवायला तयार नाही. त्याचं कारण शिवसेनेनं सरकारचा पाठिंबा काढला, तर काय करायचं याचे भाजपनं तयार केलेले ए, बी प्लॅन तयार केले होते.

त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेचे आमदार फोडून सरकार वाचविण्याचा प्लॅन होता. त्यावर कोअर समितीच्या बैठकीत अनेकदा चर्चाही झाली आहे. आमदार हर्षवर्धन जाधव शिवसेनेत नाराज होते. मात्र, आता त्यांची नाराजी दूर झाली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कन्नडला येऊन जाधव यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. आपल्या मतदारसंघातील रस्त्याची कशी दुरवस्था झाली आहे व सार्वजनिक बांधकाम मंत्री निधी देण्यास टाळाटाळ करत आहेत , याबाबतही जाधव यांनी नाराजी व्यक्त केली होती. 27 ऑक्टोबरला मुंबईत बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा यांच्याकडं मतदारसंघातील रस्त्याची कामं मार्गी लागावीत, यासाठी भेटीला गेलो होतो.
मात्र, त्या वेळी त्यांनी मला माझी सर्व कामं केली जातील, असं सांगितलं. सोबतच तुमच्या संबंधित लोकांच्या ज्या काही बदल्या असतील, त्याही केल्या जातील असं आश्वासन दिले. मात्र, तुम्ही शिवसेनेतून बाहेर पडत आमदारकीचा राजीनामा द्या व भाजपात पˆवेश करा अशी ऑफर दिली. तुम्हाला पोटनिवडणुकीत आणण्याची जबाबदारी भाजपची राहील व सोबतच पाच कोटी रुपयेही देऊ, अशी ग्वाही दिली, असा गंभीर आरोप जाधव यांनी केला.जाधव यांच्या आरोपामुळं आता चंद्रकांतदादांना लक्ष्य करण्याची शिवसेनेला आणखी एक संधी मिळाली आहे.
यापूर्वी राजेश क्षीरसागर यांनी चंद्रकांतदादांची सक्त वसुली संचालनालयामार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. काही दिवसांपूर्वी, भाजपमध्ये पˆवेश करण्यासाठी एक कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली, असा खळबळजनक आरोप पाटीदार समाजाचे नेते नरेंद्र पटेल यांनी केला होता. त्यातील 10 लाख रुपयांची रक्कम पक्षपˆवेशासाठी सुरुवातीलाच देण्यात आली. उर्वरित 90 लाख रुपये नंतर देण्यात येणार होते, असा खळबळजनक आरोप नरेंद्र पटेल यांनी केला. त्यांनी दहा लाख रुपयांची रक्कम पत्रकार परिषदेत सादर केली होती. गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते असलेले वरुण पटेल यांनी भाजप पˆवेशासाठी एक कोटी रुपये देण्याची ऑफर दिली, असा आरोपही नरेंद्र पटेल यांनी केला होता.
राज्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याची घोषणा करणार्या चंद्रकांतदादा पाटील यांनी रस्त्यांच्या स्थितीवरून पुन्हा एकदा वादगˆस्त वक्तव्य केलं आहे. रस्त्यावर खड्डे पडले म्हणजे आभाळ कोसळलं नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. रस्त्यांवर पडणार्या खड्ड्यांचं खापर आधीच्या सरकारांवर फोडत त्यांनी आपल्या सरकारचा बचाव करण्याचाही पˆयत्न केला. आधीच्या सरकारच्या काळात महाराष्ट्राला भरीव निधी मिळाला नाही. त्यामुळं जास्त काळ टिकतील असे रस्ते बनले नाहीत. रस्त्यांवरील खड्डे हे जुनेच आहेत. आता नव्यानं खड्डे पडलेले नाहीत, असं अजब तर्कट त्यांनी मांडलं. 15 डिसेंबरनंतर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित येणार्या 96 हजार किलोमीटरच्या रस्त्यांवर खड्डे दिसणार नाहीत, अशी घोषणा चंद्रकांतदादांनी केली होती.