वेळकाढूपणा करण्यासाठी ऑनलाईनचा फंडा - सुनील तटकरे
मुंबई, दि. 26, सप्टेंबर - राज्य सरकार कर्जमाफीबाबत ढोंगीपणा करत आहे. कर्जमाफीसाठी विलंब करण्यासाठीच सरकारने ऑनलाईन अर्जाचा फंडा आणला असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. मुंबई येथील प्रदेश कार्यालयात ते प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ग्रामीण भागातील अनेक लोक आज पुणे, मुंबई, नागपूरसारख्या शहरात स्थायिक झाले आहेत. त्यासोबतच ते गावाकडेही शेती करत असतात. अनेक वेळा शेती करण्यासाठी ते कर्ज देखील घेतात. मुंबई बँकेमार्फत काही शेतकर्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केला आहे असे वाचण्यात आले. मुंबई बँकेने कोणत्या शेतकर्यांना कर्ज दिले ते बँकेचे अध्यक्ष व भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी स्पष्ट करावे अशी मागणी त्यांनी केली.
तटकरे म्हणाले की, किती शेतकर्यांनी पीककर्ज घेतले याची माहिती सरकारला मध्यवर्ती बँकांकडून मिळू शकते. सरकार राष्ट्रीयीकृत बँकांकडूनही कर्जाची माहिती मिळवू शकते. पण सरकारला कर्जमाफीसाठी वेळकाढूपणा करायचा होता म्हणून ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. हे सरकार शेतकर्यांना कर्जमाफी द्यायची सोडून शेतकर्यांना बोगस म्हणून हिणवत आहे. शेतकर्यांची जी अवहेलना सुरू आहे त्याचा आम्ही निषेध करतो. सरकारच्या विरोधात आम्ही 1 ऑक्टोबर रोजी आंदोलन करणार आहोत असा इशारा त्यांनी दिला.

Post Comment