पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात मुंबई काँग्रेसतर्फे बोरिवली ते मालाड भव्य सायकल रॅली
मुंबई, दि. 26, सप्टेंबर - भाजप सरकारतर्फे केलेल्या जाचक पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली उद्या मंगळवार, 26 सप्टेंबर 2017 रोजी सायंकाळी 5. 00 वाजता बोरिवली ते मालाड भव्य सायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे. या मोर्चामध्ये संजय निरुपम यांच्यासह आमदार असलम शेख, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील आणि संदेश कोंडविलकर, जिल्हा अध्यक्ष अशोक सुत्राळे, मनोज नायर तसेच स्थानिक नगरसेवक व पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
संजय निरुपम म्हणाले की पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ करून भाजप सरकारने जो लोकांचा खिसा कापण्याचे जे षडयंत्र रचले आहे. त्या विरोधात आम्ही हा मोर्चा काढत आहोत. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात केलेल्या ’जागो मुंबईकर जागो’ या आंदोलनाचे हे दुसरे चरण आहे. याआधी आम्ही रस्त्या-रस्त्यांवर, गल्लीबोळातुन, बाजारातील तसेच पेट्रोल पंपावर येणार्या लोकांना भेटून त्यांना भाजप सरकारने लादलेल्या अवाजवी दरवाढीबद्दल जागृत केलेले आहे. आम्ही सगळ्यांना सांगत आहोत की सरकारने कसे अनावश्यक कर लादून ही दरवाढ केलेली आहे. हि सामान्य जनतेची लूट आहे.

Post Comment