Breaking News

एकाच कुटुंबातील 6 जणांची आत्महत्या !

अमरावती, दि. 28 -  अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील काठीपुरा भागात सामुहिक आत्महत्येची धक्कादायक घटना मगंळवारी दुपारी 1.30 च्या सुमारास उघडकीस आली असून, एकाच कुटुंबातील 6 जणांनी आत्महत्या केली
आहे. आत्महत्या केलेले कुटुंबिय हे अल्पभुधारक शेतकरी असून त्यांनी विष प्राषण करुन आत्महत्या केली आहे. मृतांमध्ये 4 महिलांसह 2 पुरूषांचा समावेश. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिस घटनास्थळी रवाना झाले आहेत. मृतामध्ये प्रफुल नारायण चव्हाण (वय 52 वर्ष)  विवेक नारायण चव्हाण (वय 45) मंगला नारायण चव्हाण (वय 40) लक्ष्मी नारायण चव्हाण (वय 38)कामिनी अरूण बारड - भाची (वय 25) रोषणी अरुण बारड - भाची (वय 23) या एकाच कुटुबांतील सहा जणांचा समावेश आहे.
अल्पभूधारक चव्हाण कुटुंबिय छोटेसे किराणा दुकान चालवून उदरनिर्वाह करत होते. मात्र, मंगळवारी सकाळपासून दुकान बंद होते. कधीही बंद न राहणारे दुकान आज का उघडले नाही म्हणून परिसरातील लोकांनी चौकशी केली. घर उघडून पाहिले तर, घरात सहा मृतदेह आढळले. या सहाही जणांनी रात्री विष प्राषण करुन आत्महत्या केली.